भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड

vishayachen sukh ethen vate god | pudhen avaghad yamadand

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥१॥ मारिती तोडिती झोडिती निष्ठ‍ुर । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥ असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥२॥ तप्तभूमीवरी लोळविती पाहीं । अग्नीस्तंभ बाहीं कवळविती ॥३॥ म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आतां योनी गर्भवास ॥४॥