भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा

vish potin sarva | jan bhiten taya darpa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा ॥१॥ पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥ चंदन प्रिय वासें । आवडे तें जातीऐसें ॥२॥ तुका म्हणे दाणा । कुचर मिळों नये अन्ना ॥३॥