भजनी मालिका
← भजनांकडे परत

विरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस

virodhachen maj na sahe vachan | bahu hoten man kasavis

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥ म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥ देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥ तुका म्हणे देव अंतरे यामुळें । आशामोहोजाळें दुःख वाढे ॥३॥