भजनी मालिका
← भजनांकडे परत

विरहतापें फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें चि दुश्चिती

virahatapen phunde chhand karite jati | ha ge to ge savadhan saven chi dushchiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विरहतापें फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें चि दुश्चिती । न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे कुळाहुनिया ती वो॥१॥ खुंटलीसी झाली येथें अवघियांची गती । आपुलीं परावीं कोण नेणें भोंवती । त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपती । नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥ध्रु.॥ बाहेरी च धांवे रानां न धरी च घर । न कळे बंधना झाला तेणें संचार । विसरूनि गेली सासुरें की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥२॥ तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं येथें सर्वथा बळा । त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्वाळा । बहुतां मतें येथें तर्कवाद निराळा वो॥३॥