भजनी मालिका
← भजनांकडे परत

वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे

vir viththalache gadhe | kalikal payan pade

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥१॥ करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥२॥ तुका म्हणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥३॥