भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनवितों शेवटीं । आहे तैसें माझे पोटीं

vinaviton shevatin | ahe taisen majhe potin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विनवितों शेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥१॥ कंठीं राहावें राहावें । हें चि मागतसें भावें ॥ध्रु.॥ पुरली वासना । येणें होईल नारायणा ॥२॥ तुका म्हणे जो देहाडा । तोचि वर्णीन पवाडा ॥३॥