भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा

vinaviton chatura tuj vishvambhara | pariyesi datara panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥ तुझे दास ऐसें जगीं वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ध्रु.॥ माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझें ॥२॥ लोभ मोह माया आम्हां बांधवितां । तरि हा अनंता बोल कोणा ॥३॥ तुका म्हणे मी तों पतित चि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥४॥