भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनंति घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची

vinanti ghatali avadharin | maj dei vo abhay karin | pidilon khecharin | anik vari nanvanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विनंति घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥१॥ रंगा येई वो । एकला रंग वोढवला । हरीनामें उठिला । गजर केला हाकारा ॥ध्रु.॥ देवांचे दैवते । तुज नमिलें आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धांवत ॥२॥ न लवीं आतां वेळ । आइत सारिली सकळ । तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥३॥