भजनी मालिका
← भजनांकडे परत

विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका

vikal tethen vika | mati nanv thevuni buka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥ हा तो निवाड्याचा ठाव । खरा खोटा निवडो भाव ॥ध्रु.॥ गऱ्हवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥२॥ लावूं जाणे विल्हे । तुका साच आणिक कल्हे ॥३॥