भजनी मालिका
← भजनांकडे परत

विद्या अल्प परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे

vidya alpa pari garvashiromani | majahuni dnyani koni ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विद्या अल्प परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥ अंगीं भरे ताठा कोणाते मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥ साधूचे देहींचा मानी जो विटाळ । त्रैलोकीं चांडाळ तोचि एक ॥२॥ संतांची जो निंदा करी मुखीं जपे । खतेलें तें पाप वज्रलेप ॥३॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥४॥