भजनी मालिका
← भजनांकडे परत

विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट । ज्ञानें अज्ञान नीट लाविलें दिसें

vidnyanache dnyan adnyanin ghanavat | dnyanen adnyan nit lavilen disen

विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट । ज्ञानें अज्ञान नीट लाविलें दिसें ॥१॥ मी तूं हे मात हरपले दृष्टांत । ह्रदयीं ह्रदयस्थ निजतेजें ॥ध्रु०॥ साकार निराकार शून्याशून्य दिठा । रुपीं रुपवाटा हरि माझा ॥२॥ बापरखुमादेविवरु ह्रदयस्थ घटीं । बिंबोनि उफ़राटी कळा दिसे ॥३॥