भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचारा वांचून । न पावीजे समाधान

vichara vanchun | na pavije samadhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विचारा वांचून । न पावीजे समाधान ॥१॥ देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥ देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥२॥ तुका म्हणे होतें । बहु गोमटें उचितें ॥३॥ ७ २५१५ विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥ तंव जाला साह्य हृदयनिवासी । बुद्धी दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥ उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥ तुका म्हणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥