भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा

vicha kela thoba | mhanoni nanv to vithoba

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥१॥ कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥ शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग झाला ॥२॥ तुका म्हणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥३॥