भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें

vediya upachar karitan sohale | kay sukh kale tayasi ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें । अंधापुढें दीप नाचती नाचणें । भक्तीभावेंविण भक्ती तैसी ॥१॥ तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां माथां चुना तया । खादलें म्हणोनि सेवटीं बोंबली । ठायींची भुली कां नेणां रया ॥ध्रु.॥ मुकियापासाव सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काई होय । नपुंसका काय करील पिद्मणी । रुचिविण वाणी तैसे होय॥२॥ हात पाय नाहीं करिल तो काई । वृक्षा फळ आहे अमोलिक। हातां नये तैसा वांयां च तळमळी । भावेंविण भोळीं म्हणे तुका ॥३॥