भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदवाणी चांग स्मरतां स्मरण नित्य

vedavani chang smaratan smaran nitya

वेदवाणी चांग स्मरतां स्मरण नित्य नारायण ह्रदयीं वसे ॥१॥ तेथिल गव्हर जाणता विरुळा । ब्रह्मीं ब्रह्मकळा साधुमुखें ॥२॥ जाप्य जप होम बुध्दि विधान हरि । ह्रदयीं श्रीहरि न कळे मूढा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे श्रीहरि ह्रदयस्थ । ऐसी आहे भाष्य वेदशास्त्रीं ॥४॥