भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसि

vedavalin kay karaven ya kalin | mhane vanamali gopalansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥ गोवर्धन धरूं शिरी उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥ नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोळिया ॥३॥ अशंकित चित्ते वाटे त्यां खरें । धाकें च ते बरें म्हणती चला ॥४॥ चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊं नेदी ॥५॥