भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद अनंत बोलिला । अर्थ इतुलाचि शोधिला

ved anant bolila | artha itulachi shodhila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेद अनंत बोलिला । अर्थ इतुलाचि शोधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठा नाम गावें ॥ध्रु.॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुलाचि निर्धार ॥२॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥३॥