भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां

vatuli pahatan sinale dolule | davisi paulen kain vo dolan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥१॥ तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥२॥ कांभा मोकलिल्ये कोना निरविले । कठिन कैसे जाले हृदय तुजे ॥३॥ तुका म्हणे माझ्या असांवल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥४॥