भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाट पाहें हरी कां नये आझूनि । निष्ठुर कां मनीं धरियेलें

vat pahen hari kan naye ajhuni | nishthur kan manin dhariyelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाट पाहें हरी कां नये आझूनि । निष्ठुर कां मनीं धरियेलें ॥१॥ काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥ नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥२॥ नाही कळों आलें अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥३॥ बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कुरवाळिलें ॥४॥ तुका म्हणे देई एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होईल मग ॥५॥