भजनी मालिका
← भजनांकडे परत

वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं

vas narayanen kela mathuresi | vadhuni dushtansi taye thayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥१॥ ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥२॥ लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥ देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥ येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥ काया वाचा मन कृष्णीं रत झालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥ ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका म्हणे चित्ती ॥७॥