भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी

varma tari amhan dava | kay deva janen mi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥ बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥ द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥२॥ तुका म्हणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥३॥