भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां

vanyanvin vadhavila ha laukik | anila latik vad doghan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥१॥ नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥ शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥२॥ जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥ तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥४॥