भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांया हांव भरी नका घालूं मन । चिंतावे चरण विठोबाचे

vanya hanv bhari naka ghalun man | chintave charan vithobache

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
वांया हांव भरी नका घालूं मन । चिंतावे चरण विठोबाचे ॥१॥ हेंचि साधन साराचें सार । येणें भवपार उतरती ॥२॥ न करी आळस नामाचा क्षणभरी । कामक्रोध दुरी पळे येणें ॥३॥ दया क्षा शांति संतांची संगती । यां परती विश्रांती दुजी नाहीं ॥४॥ चोखा म्हणे दृढ धरावा विश्वासा । नामाचा निजध्यास सर्वकाळ ॥५॥