भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांटा घेई लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी। सार नेती आणीक

vanta ghei lavakari | magen antarasi duri | keli bharovari| sar neti anik

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वांटा घेई लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी। सार नेती आणीक ॥१॥ ऐसीं भांमावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥ नाहीं सरलें तोंवरी । धांव घेई वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥२॥ फट लंडी म्हणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥३॥