भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांझेनें दाविलें गऱ्हवार लक्षण । चिरगुटें घालून वाथयाला

vanjhenen davilen garhavar lakshan | chiraguten ghalun vathayala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वांझेनें दाविलें गऱ्हवार लक्षण । चिरगुटें घालून वाथयाला ॥१॥ तेवीं शब्द झनी करिती चावटी । ज्ञान पोटासाठी विकूनियां ॥ध्रु.॥ बोलाचि च कढी बोलाचा चि भात । जेवुनियां तृप्त कोण झाला ॥२॥ कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥३॥ तुका म्हणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं निसुगाला ॥४॥