भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति

vanja gai dubhati | deva aisi tujhi khyati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥ ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥ चातक पाखरूं। त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥ पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास॥३॥ तुका म्हणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥४॥