भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं

valuniyan jan sandi maj duri | karisil hari aisen kadhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥१॥ आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥ नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥२॥ तुका म्हणे ऐसी धरितों वासना । होइप नारायणा साह्य मज ॥३॥