भजनी मालिका
← भजनांकडे परत

वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई

valiten jen gai | tyasi phar lage kai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥ निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥ न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥२॥ सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ॥३॥