भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णवें चोरटीं । आलीं घरासी करंटीं

vaishnaven choratin | alin gharasi karantin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैष्णवें चोरटीं । आलीं घरासी करंटीं ॥१॥ आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥ ज्याचे घरीं खावें ।त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥२॥ तुका म्हणे माग । नाहीं लागों देत लाग ॥३॥