भजनी मालिका
← भजनांकडे परत

वडाच्या पानीं एक उभविलें देउळ

vadachya panin ek ubhavilen deul

वडाच्या पानीं एक उभविलें देउळ आधिं कळसु मग पायाहो । देव पुजों गेलों तंव देउळ उडालें पान नाहीं तेथें वडुरे ॥१॥ चेत जाणा तुम्हि चेत जाणा । टिपरि वडाच्या साई हो ॥२॥ पाषाणाचा देवो पाषाणाचा भक्ति पोहती मृगजळ डोहीं हो । वांझेचा पुत्र पोहों लागला तो तारी देवां भक्ता हो ॥३॥ भवाब्धिसागर नुतरवे ते पडिलें रोहिणी डोहीं हो । नसंपडे आत्मा बुडाले संदेहीं ते गुंतले मायाजळीं हो ॥४॥ विरुळा जाणें पोहते खुणें केला मायेसि उपावो हो । बापरखुमादेविवरुविठ्ठ्ल विसावा तेणें नेलें पैल थडिये वो ॥५॥