भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचेचिया आळा कविळलें ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो

vachechiya ala kavilalen bramha | chukavila shram pruthak to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाचेचिया आळा कविळलें ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥ सुलभ झालें सुलभ झालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥ नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥२॥ तुका म्हणे वाटे चुकली वसती । उधार तो हातीं आणियेला ॥३॥