भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे विठ्ठल नाहीं । तोचि प्रेतरूप पाहीं

vache viththal nahin | tochi pretarup pahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाचे विठ्ठल नाहीं । तोचि प्रेतरूप पाहीं ॥१॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥२॥ जातां कांटाळे देउळा । तोचि सुना मुखकाळा ॥३॥ हरीभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥४॥ तुका म्हणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥५॥