भजनी मालिका
← भजनांकडे परत

वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे

vachana phirati adham jan | narayan to navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥१॥ केला असता अंगीकार । न मनी भार समर्थ ॥ध्रु.॥ संसाराचा नाहीं पांग । देव सांग सकळ ॥२॥ तुका म्हणे कीर्त वाणूं । मध्यें नाणूं संकल्प ॥३॥