भजनी मालिका
← भजनांकडे परत

वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदते अंतरा वज्रा- ऐसें

vachan ten nahin todit sharira | bhedate antara vajra- aisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदते अंतरा वज्रा- ऐसें ॥१॥ कांहीं न सहावें काशा हि करणें । संदेह निधान देह बळी॥ध्रु.॥ नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥२॥ तुका म्हणे जरी गिळी अहंकार । तरी वसे घर नारायण॥३॥