भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति

uttam tya yati | deva sharan ananyagati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥१॥ नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥ उमटती ठसे । ब्रम्हप्राप्ति अंगीं दिसे ॥२॥ भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी॥३॥