भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊ नेदी

uttam ghalaven amuchiye mukhin | nivaraven duhkhi hou nedi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊ नेदी ॥१॥ न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥ नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥२॥ तुका म्हणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाह्य रूप ॥३॥