भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात

upajoniyan pudhati yeun | kala khaun dahimbhat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१॥ वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥ एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥२॥ तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥३॥