भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजलें देह बाळपणें गेलें तुझें

upajalen deh balapanen gelen tujhen

उपजलें देह बाळपणें गेलें तुझें तुजचि देखतां तारुण्यपण मत्सरें आटलें आतां वृध्दपणीं कायिसि अवगणी रया ॥१॥ कवण्यागुणें चुकी साठीं पडली कासया श्रमलेंसि गव्हारा । सिध्दिचि सांडूनी आनेआन जल्पसी तरी न चुकती तुझ्या येरझारा रया ॥२॥ अजागळाचे अजस्तन । तेथें कैचें अमृतपान । तैसें काय करिसी वाउगें चिंतन परपीडा जागृती कारण । तरी तयाचिये चरणीं स्थिर ठेवीं मन रया ॥३॥ जीवनजळीं ब्रह्मकमळ विकाशलें । आतां पाहे पां तयाचा मेळुरे । ऐसी जीवीं चिंता । तुजवांचूनिया कवण करील आमुचा सांभाळु रया ॥४॥ जीवनजळीं ब्रह्म कमळ विवळे तैसे वाट पाहतां सिणले माझे डोळें । नको नागवे हा संसार नको तूं तंव निवांत निराळा रया ॥५॥ ऐसा जगाचा जीवनु अमूर्त मूर्ति लेईलों डोळां । बापरखुमादेविवराविठ्ठला वांचूनि कोण पुरविल सोहळा रया ॥६॥