भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजले मनीं । हे तों स्वामीची करणी

upajale manin | he ton svamichi karani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपजले मनीं । हे तों स्वामीची करणी ॥१॥ होईल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥ येईल अभय जरि । तरि हे आज्ञा वंदिन शिरीं ॥२॥ भक्तीप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना ॥३॥ यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥४॥ तुका म्हणे आळी करा । त्यासी योजावें उत्तरा ॥५॥