भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपदेश तो भलत्या हातीं । झाला चित्तीं धरावा

upadesh to bhalatya hatin | jhala chittin dharava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपदेश तो भलत्या हातीं । झाला चित्तीं धरावा ॥१॥ नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥ स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥ तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥