भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं

upadesh kiti karava khalasi | navade tayasi baren kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥ शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ध्रु.॥ नाहीं भाव मनीं नाइके वचन । आपल्या आपण नाडियेले ॥२॥ तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रात्रंदिवस ॥३॥