भजनी मालिका
← भजनांकडे परत

उंच पताका झळकती ।टाळ मृदंग वाजती

unch pataka jhalakati |tal mrudang vajati

उंच पताका झळकती ।टाळ मृदंग वाजती । आनंदें प्रेमें गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचें ॥१॥ आले हरीचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट । भेणें जाहले दिप्पट । पळति थाट दोषांचे ॥२॥ तुळसीमाळा कंठी । गोपीचंदनाच्या उटी । सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी । बारा वाटा पळताती ॥३॥ सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ह्रदयकमळीं । शांति क्षमा तया जवळी । जीवेंभावें अनुसरल्या ॥४॥ सहस्त्र नामाचे हातियेर । शंख चक्राचे श्रृंगार । अतिबळ वैराग्याचे थोर ।केला मार षड्रवर्गां ॥५॥ ऐसें एकांग वीर । विठ्ठल रायाचें डिंगर । बाप रखुमादेवीवर । तींही निर्धारी जोडिला ॥६॥