भजनी मालिका
← भजनांकडे परत

उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड

ujalavaya alon vata | khara khota nivad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥ बोलविले बोलें बोल । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥ तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥ तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गाबाळ ॥३॥