भजनी मालिका
← भजनांकडे परत

उद्धाराचा संदेह नाहीं । याचा कांहीं सेवकां

uddharacha sandeh nahin | yacha kanhin sevakan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उद्धाराचा संदेह नाहीं । याचा कांहीं सेवकां ॥१॥ पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥ बुडतां जळीं जळतां अंगीं । ते प्रसंगीं राखावें ॥२॥ तुका म्हणे आम्हांसाठी । कृपा पोटीं वागवी ॥३॥