भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे

udand pahile udand aikile | udand varnile kshetramahime

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥ एसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटे वरी देव कोठे ॥ध्रु.॥ ऐसे संतजण ऐसे हरीदास । ऐसा नाम घोष सांगा कोठे ॥२॥ तुका म्हणे आम्हां अनाथां कारणे । पंढरी निर्माण केली देवे ॥३॥