भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे

uchitacha kal | sadhavaya yuktibal | apalen sakal | te prasangin pahije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥ नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥ जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें तें शोभे ॥२॥ पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे घरी । सेज जमा शेवटीं ॥३॥