भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता

uchitacha data | krupavanta tun ananta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥१॥ कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥ काय बळयुक्ती । नाहीं तुझे अंगीं शक्ती ॥२॥ तुका म्हणे तूं विश्वंभर । ओस माझें कां अंतर ॥३॥