भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले

uchitacha bhag hoton rakhoniyan | disati te vanyan kashta gele

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥१॥ वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥ विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥२॥ तुका म्हणे एकीं थार नाहीं बुड । कैसें तुह्मीं कोड पुरविलें ॥३॥