भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तोचि देईल तें खावें

tyannin dhanivari sang kela harisaven | deuni apulen tochi deil ten khaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तोचि देईल तें खावें ॥१॥ न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हाचि निर्धार त्याला ॥ध्रु.॥ कान्होबा तू जेवीं घासोघासीं आळविती। आरुष गोपाळें त्यांची बहु देवा प्रीती ॥२॥ तुका म्हणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोय वांचविलें ऐसें सांगों रे दातारा ॥३॥