भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला

tyanchya purvapunya kon lekha kari | jinhin to murari khelavila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥१॥ खेळविला जिंहीं अंतर्बाह्यसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥ दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥३॥ जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥ ज्यांचें कृष्णीं तन मन झालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥ विष तयां झालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥ एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥ वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥८॥ भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका म्हणे जैसी स्फटिकशिळा ॥९॥